थोडं हृदयातलं - विजय शिंपी



 गेट टुगेदर हा माझ्यासाठी फक्त एक शब्द नसून मनाला खूप सुखद अनुभव देणारी एक वास्तव होते. कारण एकच की तब्बल २० वर्षानंतर आपण सगळे एकत्र जमणार, एकदुसऱ्याशी गप्पागोष्टी करणार ,परत एकदा त्याच वर्गात बेंचवर बसणार आणि खूप काही.

 

        जवळजवळ २ महिन्याआधीची तयारी आणि त्यात पण माझ्या सवडीला विशेष महत्त्व,कारण होते की मी सगळ्यात लांब होतो आणि मीच तारीख ठरवली ती म्हणजे २३ एप्रिल.पण ते म्हणतात ना की दैव जानिले कुणी तशातलाच प्रकार माझ्याबरोबर घडला.विदेशाचा योग आला तो पण ऑफिसिअली आणि न मानता,माझे एक न एकता कंपनी ने प्लॅन फिक्स केला आणि फ्लाईट ची तिकीट झाली ती पण २३ एप्रिलची.हे पचवणे माझ्यासाठी खूप कठीण होते परंतु नाईलाज होता कारण की फर्स्ट प्रायोरिटी ही तुमचा जॉब असतो ही जाणीव मला होती.कारण माझा पण पहिलाच आफ्रिका दौरा होता आणि जाणेही अनिवार्य होते.मी हा ब्लॉग लिहिताना ही आफ्रिकेतच आहे अजूनही भारतात आलेलो नाही.


         भरत आणि बाकी मित्रांनी जे आयोजन केले ते अप्रतिम , अविस्मरणय आणि वाखण्यायोग्य आहे कारण एकच की आपण आपल्या मित्रांव्यतिरिक्त आजी माजी शिक्षकांना सुद्धा सहभागी करून त्यांना मान दिला आणि विशेष म्हणजे या एका निमित्ताने ते सुद्धा एकत्र आलेत.


          खूपच छान भरत and टीम.. मी येऊ शकलो नाही याची खंत मला आयुष्यभर राहील आणि या ब्लॉग च्या निमित्ताने माझे सर्व मित्र आणि मैत्रिणींनो एकच विनंती आहे,की आपण २० वर्षानंतर जमलात असे आपण परत कधी जमू शकतो याच्यावर विचार करावा जेणेकरून मीही भेटू शकेल सगळ्यांना, जसे की २५ वर्षानंतर एकदा पुन्हा भेटू शकतो. 


आपला,

विजय पंडित शिंपी

Comments

Popular posts from this blog

स्नेह मेळावा

आठवणींची शाळा

कै.सुं.सि.मालपुरे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा