कै.सुं.सि.मालपुरे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
कै.सुं.सि.मालपुरे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा वीस वर्षांनी पुन्हा भरला वर्ग लोहटार - रावसाहेब पाटील,देशदूत वार्ताहर लोहटार येथील कै.सुं.सि.मालपुरे माध्यमिक विद्यालयातील २००३ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा वीस वर्षानंतर पुन्हा वर्ग भरला.निमित्त होतं या बॕचच्या स्नेह मेळाव्याचे.संपूर्ण दिवसभर शाळेत राहून विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या माजी सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम 'गार्ड आॕफ आॕनर' दिला.विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देतांना आपले व्यावसायिक,सामाजिक,शैक्षणिक कार्य सर्वांसमोर मांडले.जळगाव,नाशिक,सुरत,धुळे,नागपूर अशा विविध ठिकाणांवरून विद्यार्थी या मेळाव्यासाठी आलेले होते.विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.मनोज जोशी,योगेश ब्राम्हणे,प्रियंका येवले,अविनाश अहिरे,किरण राजपूत व भरत पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.माजी विद्यार्थी ही विद्यालयाची खरी संपत्ती असल्याचं मत संस्थेचे चेअरमन डॉ.जगदिश महाजन यांनी व्यक्त केले.यावेळी एन.आर.पाटील,बी.एस.चौधरी,आर.पी.पाटील,एस.आर.परदेशी,ए.बी.महाजन,एम.सी.सोमपूरकर,पी.के.महाजन,...