स्नेह मेळावा


 स्नेह मेळावा 

       सर्वांना नमस्कार🙏🙏 आताच झालेला आपला स्नेह मेळावा वर्ग १० वी २००३/०४ खूपच विलक्षणीय होता.. ज्यात आपल्या सर्व मित्रांनी एक team work पणे जबाबदारी पार पाडून कार्यक्रम हा यशस्वीपणे पार पाडला.. ज्याच कौतुक सर्व आजी माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यानी केले.. 

       कार्यक्रमाच्या दिवशी ज्याने त्याने आपली जबाबदारी वाटून घेतली होती,त्यामुळे फारशी अडचण जाणवली नाही.. काही चुका होऊ नये यासाठीच सर्वांनीच प्रयत्न केले.. अगदी सजावटीपासून ते शेवटच्या निरोप समारंभापर्यंत सर्व काही मनासारखे घडले आणि याच सर्व श्रेय team ला जातं..

         जेव्हा मुलांच्या whts app group ला स्नेह मेळावा संबंधित चर्चा झाली तेव्हा वाटलं नव्हत की अस काही आयोजन होईल पण ते झालं आणि ते आयोजन अजूनही डोळ्यांसमोर जात नाहीये.. कारण तब्बल १९ वर्षानंतर सर्वांच्या भेटीगाठी ह्या खूप उल्हासदायक होत्या आणि त्या जुन्या आठवणीना उजाळा देऊन गेल्यात..विशेष म्हणजे ज्यांनी ज्यांनी आपली उपस्थिती नोंदवली तेच या कार्यक्रमाचे एक खूप मोठे विलक्षण होते.

           सर्वप्रथम कार्यक्रमात नंदू ने खूप सुंदर अस समालोचन  केलं.. कार्यक्रमाचा जो एक base असतो तो त्याने अगदी योग्यपणे पार पाडला..एकंदरीत कार्यक्रमाची सुरुवातच छान झाली.. त्यानंतर मनोगत हा विषय जेव्हा आला.. तेव्हा मी कार्यक्रमात बोललोच होतो की भरत ने मला सांगितलं की तुला मनोगत द्यायचं आहे.. तर त्यात २ गोष्टी मी सांगायच्या विसरलो होतो की जी प्रियंका आपली गोष्ट सादर करण्यासाठी कुठलाही विचार न करता सादर करते आणि मग नंतर त्यावर विचार करते ( आपल्या सर्वांच्या मते आणि एस.आर. परदेशी सरांच्या मते)तर ती मनोगत देऊ शकते 😜तर आपण का नाही? 😎मनोजसारखा मित्र मनोगत देऊ शकतो तर मग मी का नाही.. ? 🤓 तर असा तो sceen होता..this is part of the joke.. plz कोणी मनावर घेऊ नका.. joke करायची सवय आहे माझी 🙏🙏

             मनोगताची सुरुवात करतानाच मी म्हटलं होत की मी काही फार मोठा वक्ता नाहीये म्हणून कृपया मला judge करू नये 😜🙏🙏.. आठवणींचा इतका मोठा डोंगर डोळ्यांपुढे उभा होता पण कसा आणि कुठून व्यक्त करावा ते सुचत नव्हत.. ज्यात मी बी. एस. चौधरी सरांचे बैठे बैठे सावधान..के.डी.परदेशी सरांची अनोखी शिक्षा😜 सोंपूरकरसरांच ब्रिद वाक्य..कळल का ? एम.आर.परदेशी सरांच बराम्हणे की चांगला म्हणे..अश्या गोष्टी मी miss केल्या..याचंही एक कारण होत.. ते २६ तारखेला माझ्या मित्रांना कळाल..तर काहीना माझ्या facebook post वरून कळाल..कार्यक्रमात मी कार्यक्रमात आहे असंच मी दर्शविले परंतु अडचणी खूप वाईट होत्या.. चित्त सर्व दुसरीकडे होत.. मनोगतात मी म्हटलं की आज २३ एप्रिल आहे उद्या २४ एप्रिलला आईला जाऊन ३ वर्ष पूर्ण होतील..आणि त्या situation ला वडील हे संभाजीनगर हेडगेवार हॉस्पिटलला admit होते.. आणि लगेच २६ एप्रिलला ते शांत झाले.. 

              स्वतःविषयी सांगतांना मी माझ्या मित्रांची वाटचाल,दिशा explain केली..माझी समाधानाची वाटचाल देखिल explain केली..कोरोनासारख्या महासंकटाला ओलांडून आपण एकमेकांना भेटू शकलो हे देखिल आपले भाग्य ठरले..बरच काही मला बोलायचं होत परंतु वडील admit असल्यामुळे एकंदरीत या ताणावाचा थोडा फार फरक हा माझ्यावर झाला होता पण कार्यक्रमात मी तो कोणाला समजू दिला नाही.. स्वतःच्या मोबाईलवर मी सर्वांचे photos/videos घेत होतो.. मात्र स्वतःचा एक pic मी घेऊ शकलो नाही.. माझ्या मित्रांसोबत मला हवा तसा time spend करता आला नाही.. त्यांच्यासोबत सेल्फी घेता आला नाही व्यवस्थित त्यांच्याशी गप्पा करता आल्या नाही. ही मोठी खंत मला असेल.. जसे तसे मनोगत आटोपले कारण नंदू ने हातात time अशी चिठ्ठी लिहून दिली.. त्यावेळी खूप मोठा वक्ता असल्याची feeling आली.. कारण १ ऑगस्टला पाठांतर केलेलं भाषण लक्षात नसायचं आणि इथं कुठलीही तयारी नसतांना बोलायचं आणि बोलताना आपल्याला वेळेचं बंधन असल्याची आठवण करुन द्यायची हे एक गजब होत..

           finally खूप बरे वाटले पण परतीचा प्रवास करण्याची मनात इच्छा नव्हती.. सर्व members हे नियोजित वेळी जेवत असतील मात्र त्या दिवशी अक्षरशः ३:३० वाजण्यात आले होते आणि आमचे गुरुजन आम्हाला जेवण्यास सांगत होते.. तरीही आम्हाला भूक नव्हती ही सुध्दा कमालच होती.. तसेच व्ही.डी.वाणी सर आपल्या lecture मध्ये इतके deep गेले होते की जणू आपले retirement ते विसरले होते आणि त्यांना थांबवणे देखील आम्हाला नको वाटत होत..असे हे आगळे वेगळे प्रसंग आम्ही स्नेह मेळाव्यात अनुभवले.. असा स्नेह मेळावा मला पुन्हा मिळावा आणि त्या स्नेह मेळाव्यात माझा तन आणि मनापासून सहभाग असावा हीच अपेक्षा असेल.. 🙏🙏🙏🙏 पुन्हा एकदा सर्वांना miss करतोय.. सर्वांनी काळजी घ्या आणि संपर्कात रहा.. 👍👍👍


तुमचा मित्र - योगेश किशोर ब्राम्हणे 😊

Comments

Popular posts from this blog

आठवणींची शाळा

कै.सुं.सि.मालपुरे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा