स्नेह मेळावा
स्नेह मेळावा सर्वांना नमस्कार🙏🙏 आताच झालेला आपला स्नेह मेळावा वर्ग १० वी २००३/०४ खूपच विलक्षणीय होता.. ज्यात आपल्या सर्व मित्रांनी एक team work पणे जबाबदारी पार पाडून कार्यक्रम हा यशस्वीपणे पार पाडला.. ज्याच कौतुक सर्व आजी माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यानी केले.. कार्यक्रमाच्या दिवशी ज्याने त्याने आपली जबाबदारी वाटून घेतली होती,त्यामुळे फारशी अडचण जाणवली नाही.. काही चुका होऊ नये यासाठीच सर्वांनीच प्रयत्न केले.. अगदी सजावटीपासून ते शेवटच्या निरोप समारंभापर्यंत सर्व काही मनासारखे घडले आणि याच सर्व श्रेय team ला जातं.. जेव्हा मुलांच्या whts app group ला स्नेह मेळावा संबंधित चर्चा झाली तेव्हा वाटलं नव्हत की अस काही आयोजन होईल पण ते झालं आणि ते आयोजन अजूनही डोळ्यांसमोर जात नाहीये.. कारण तब्बल १९ वर्षानंतर सर्वांच्या भेटीगाठी ह्या खूप उल्हासदायक होत्या आणि त्या जुन्या आठवणीना उजाळा देऊन गेल्यात..विशेष म्हणजे ज्यांनी ज्यांनी आपली उपस्थिती नोंदवली तेच या कार्यक्रमाचे एक खूप मोठे विलक्षण होते...



















































































































































































Comments
Post a Comment